DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मनात गोष्टी साचून राहिल्यास समस्यां निर्माण होतात – डॉ . केतकीताई पाटील

मुक्ताईनगर -मनात गोष्टी साचून राहिल्यास समस्यां निर्माण होतात असे प्रतिपादन डॉ. केतकीताई पाटील यांनी केले. त्या डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन आयोजित जगावे आनंदे मेंटल हेल्थ कार्यक्रमात बोलत होत्या .

सदर कार्यक्रम मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बुधवार रोजी आयोजित करण्यात आला होता.यावेळी मंचावर सपोनि संदीप दूण गहू . सपोनि आशिष आडसूळ , डॉ. केतकीताई पाटील , डॉ. विलास चव्हाण , डॉ. बबन ठाकरे , डॉ. सौरभ भुतांगे उपस्थित होते.सपोनि दूणगहू यांनी प्रास्तविक करतांना सर्वच क्षेत्रात मानसिक आरोग्याची गरज भासते . हा न ओळखू येणारा आजार आहे

 

. मानसिक जागृती गरजेची आहे असे सांगितले .डॉ. केतकीताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या मनात जी कुजबुज आहे त्यासाठी मानसिक आरोग्य आहे . आपले काम करून कुटुंब स्टेबल ठेवणे हे म्हत्वाचे काम असते . मनात काही गोष्टी साचून ठेवलेल्या असतात त्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो. स्ट्रेस कमी करण्यासाठी आपले छंद जोपासले पाहिजे . आपल्याला मानसिक आरोग्याची गरज आहे हे स्वीकारले पाहिजे . जशा जबादारी वाढत जातात तसतसा संवाद कमी होत जातो. त्यामुळे व्यक्त झाले पाहिजे .

व्यक्त झाले कि तणाव कमी होतो.डॉ. विलास चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात स्ट्रेस हा प्रत्येक घरापर्यंत पोहचला आहे . आत्महत्त्या करणारी व्यक्ती दोन ते तीन महिने स्ट्रेसमध्ये असते . या आजारावर उपचार आहे . यावर आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागत नाहीत . निर्णय घेण्यास विलंब होणे , छातीत धडधडने , शरीर दुखी वाढत जाणे , चिडचिड होणे हि लक्षणे असल्याचे सांगितले .डॉ. बबन ठाकरे यांनी कोरोनानंतर या आजराग्रसतांचि संख्या वाढली आहे . सकारात्मक विचार आणि दृष्टी महत्वाची आहे . कोणत्या गोष्टी तुम्ही कशाप्रकारे हाताळतात यावर बरेच काही अवलंबून आहे असे सांगितले . डॉ. सौरभ भुतांगे यांनी मानसिक आरोग्याची गरज असणे म्हणजे कमजोरी आहे असे नाही असे सांगत अनेक उदाहरणे दिली.या नंतर उपस्थितांच्या शकांचे समाधान करण्यात आले. कार्यक्रमाला मुक्ताईनगर , बोदवड , वरणगाव , सावदा येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.