DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भुसावळ हादरले ; ३१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून

भुसावळ ;- उधारीचे पैशांच्या कारणावरून एका ३१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याने भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. मामीच्या मुलीच्या लग्नासाठी उधारीवर तरुणाने पैसे दिले होते. यातील काही रक्कम परत मागण्यासाठी तरुण मामीला बोलला होता. मात्र त्याचा राग आल्याने मामीने तिच्या नातेवाईकांकडून सकाळी तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

नजीर शेख नासीर (वय ३१, मणियार हॉल, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. खडका प्लॉट परिसरात मण्यार हॉल परिसरामध्ये नजीर शेख हा आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी अशा परिवारासह राहतो. त्याचं माहीर फिटनेस नावाचं जिम आहे. त्याद्वारे तो उदरनिर्वाह करतो. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नजीर शेख याने काही महिन्यांपूर्वी त्याच्या मामीला मुलीच्या लग्नासाठी पैसे दिले होते. पैसे परत मागण्यांसाठी शेख यांनी मामीला सांगितले यावेळी त्या ठिकाणी कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. यातून मामीने नजीर शेख याला, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती.

 

रविवारी सकाळी नजीर शेख हा खडका रोड परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ असणाऱ्या मण्यार हॉलजवळ त्याचे माहीर फिटनेस हे जिमचे दुकान उघडण्यासाठी गेला होता. त्यावेळी दबा धरून बसलेले नजीर शेख याचे मामीचे भाऊ इजाहर शेख उर्फ इजू जलालुद्दीन आणि मामीचा भाचा शेख आसिफ शेख दाऊद यांनी त्याच्यावर चाकूने छातीत वार केला. तसेच हातावर देखील चाकू मारला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्याला त्याच्या नातेवाईकांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन पाटील यांनी त्यास तपासणी अंति मयत घोषित केले. दरम्यान, बाजारपेठ पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानुसार पोलीस संशयित आरोपींच्या मागावर लागले आहे.

तर नातेवाईकांकडून माहिती घेऊन फिर्याद दाखल करण्याचे काम बाजारपेठ पोलीस स्टेशनला सुरू होते दरम्यान नजीर शेख याच्या खुनामुळे त्याच्या परिवारावर मोठा आघात कोसळला आहे. तसेच भुसावळ शहरात पुन्हा एकदा खून झाल्यामुळे शहरातील खुनाचे सत्र कायम आहे. घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.