DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिल्हा परिषदेच्या उपअभियंताला चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना अटक

चाळीसगाव;– क्लस्टरची रक्कम काढून देण्यासह अतिरिक्त अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्याला रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार यांनी डॉ . शामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग ,ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते. या कामाची ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ विसपुते ( वय ५७, रा. अशोक नगर, धुळे ) यांनी तक्रारदाराला पाच लाख रूपयांची मागणी केली होती.

दरम्यान, संबंधीत कंत्राटदाराने या संदर्भात नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा रचून ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ विसपुते यांना चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना रंगे हाथ अटक केली.
सदर कारवाई एसीबी नाशिकच्या अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक स्वप्नील राजपूत यांच्या नेतृत्वाखालील प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, अविनाश पवार आणि सुरेश चव्हाण या कर्मचार्‍यांच्या पथकाने केली. या संदर्भात चाळीसगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.