DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एसडी-सीड तर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन

जळगाव ;- सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजकता विकास योजनेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य एसडी-सीड च्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन व कार्याध्यक्षा मिनाक्षीताई जैन यांच्या मार्गदर्शनाने सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून योजनेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन केले जात असते. याच धर्तीवर विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक नियोजन, बचत व गुंतवणूक यासंदर्भात जागरूकता व्हावी यासाठी “आर्थिक नियोजन व गुंतवणूक” विषयावर महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, जळगाव येथे श्री. देवेश खिवसरा (सी.ए.) यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

आपले खर्च लिहून ठेवणे, बचतीचे नियोजन, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणि बचतीचे ध्येय या मार्गांचा अवलंब केल्यास आपल्यावर आर्थिक संकट येऊ शकत नाही. आर्थिक नियोजनात आर्थिक बचत ही महत्वाची आहेच परंतु गुंतवणूक हा पर्याय आजच्या घडीला अधिक फायद्याचा आहे. वाढत्या महागाई पेक्षा आपल्याला दोन पावलं पुढे रहावयचे असल्यास योग्य ठिकाण व योग्य परताव्याचा अभ्यास करून गुंतवणूक करणे हे अत्यावश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

डेड इनवेस्टमेंट पेक्षा उत्पन्न देणारी गुंतवणूक करणे. दीर्घ कालीन गुंतवणूक करणे.जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणूकींची माहिती घेणे. आपल्या बचत व गुंतवणूकीत सातत्य ठेवणे.गुंतवणूक केल्यानंतर सय्यम ठेवणे.

तसेच शिक्षण, घर, गाडी, लग्न व शेवटी म्हातारपण या गोष्टींसाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी बॉन्ड , एफ.डी., शेयर मार्केट, सोने-चांदी खरेदी आणि मालमत्ता विकत घेणे हे महत्त्वपूर्ण पर्याय आहे. तसेच यातील दीर्घकालीन शेयर म्हणजेच म्युच्यूअल फंड हा सर्वात उत्तम परतावा देणारा पर्याय आहे असेही त्यांनी सांगितले. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनापासूनच जर आर्थिक बचत व गुंतवणूकीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले तर आर्थिक विषमता नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या कडे पैसा असून गुंतवणूकीचे ज्ञान नसल्यामुळे त्याच्यात वाढ करता येणे कधीही कठीण आहे. गुंतवणूक करण्यासाठी नेहमी फार मोठ्या रकमेपासून सुरुवात करावी लागते असा गैरसमज आजच्या घडीला आहे, खरंतर तसे नसून आपण कमीत कमी ५०० रुपयांपासून सुद्धा एस.आय.पी. मध्ये गुंतवणूकीला सुरुवात करू शकतो असे त्यांनी सांगितले.

सदर कार्यशाळेला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. एस. पाटील, ज्युनियर कॉलेज प्रमुख श्री. एस. डी. पाटील व एसडी-सीड समन्वयक विरभूषण पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. निलेश पाटील यांनी केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.