DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर संतप्त झालेल्या तरुणानी केले चाकूने वार

पाचोरा ;- विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणीने त्याचेवर धारदार चाकूने हल्ला चढवित तरुणास जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी तरुणावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन जखमी तरुणाच्या बहिणीच्या फिर्यादीवरून तरुणी विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन हल्ला करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे.

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील तलाठी काॅलनी येथील रहिवाशी निलेश दिलीप बोरसे यांचे विरुद्ध साक्षी नरवाडे रा. बस स्टँड रोड, पाचोरा हिने सन – २०२१ मध्ये निलेश विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तद्नंतर वेळोवेळी साक्षी हिने निलेशकडे माझ्या शी लग्न कर असा तगादा लावुन धरला होता. दरम्यान निलेश बोरसे यास पुलगाव जि. वर्धा येथील अॅम्युनेशन डेपो मध्ये नौकरी लागली. मात्र साक्षी ही पुलगाव येथे जावुन निलेश यास माझ्याशी लग्न कर अशी मागणी करत असल्याची माहिती निलेश याने त्याची बहिण योगिनी हिला दिली होती. १५ सप्टेंबर रोजी योगिनी व भाऊ निलेश, आई कमलबाई व वडिल दिलीप बोरसे हे तलाठी काॅलनीतील घरात असताना रात्री ९:३० वाजेच्या सुमारास बाहेरुन ओरडण्याचा आवाज आला असता आम्ही सर्व बाहेर आलो असता गेट जवळ साक्षी नरवाडे हिने निलेशकडे पाहुन शिवीगाळ करत गेट उघडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कमलाबाई बोरसे यांनी साक्षी हिस शिवीगाळ करु नकोस असे सांगितले. साक्षी हिने तिच्या जवळील चाकु काढुन मारणार तितक्यात दिलीप बोरसे यांनी साक्षी हिचा हात धरला असता साक्षी हिने दिलीप बोरसे यांना लाथ मारली. त्यावेळी निलेश याचेसह गल्लीतील नागरिकांनी साक्षी हिस समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र साक्षी ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. साक्षी हिने पुन्हा निलेश यास माझ्याशी लग्न कर नाहीतर तुम्हाला सर्वांना जिवंत सोडणार नाही. असे म्हणत असतांनाच साक्षी हिने तिच्या जवळ असलेल्या धारदार चाकूने निलेश याचे हातावर, मानेवर वार केले. या झटापटीत साक्षी हिस आवरण्यासाठी गल्लीतील सतिष पाटील हे गेले असता त्यांना देखील चाकुने हाताला जखम झाली. घटनास्थळावरून दिलीप बोरसे व कमलाबाई बोरसे हे पोलिस स्टेशनला गेल्यानंतर लगेच पोलिसांच्या गाडीचा सायरनचा आवाज येताच साक्षी घटनास्थळावरुन निघुन गेली. निलेश गंभीर दुखापत झाल्याने त्यास परिवाराने येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले‌. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी निलेश यांची बहिण योगिनी दिलीप बोरसे यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत सा
क्षी नरवाडे हिच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन साक्षी हिस पोलिसात ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे हे करीत आहे..

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.