DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

जळगाव – पोलीस स्थापना दिनानिमित्त सोमवार, दि. 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय (एम.जे.कॉलेज) येथे शस्त्र, श्वानपथक, पोलीस बँड, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस यंत्रणा यांचे प्रदर्शन जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते होणार आहे.

जळगावकर नागरिक तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सदर प्रदर्शनाला भेट देऊन पोलीस हाताळत असलेले यंत्र व शस्त्रांविषयी माहिती जाणून ध्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
सदर उपक्रम मागील ८ वर्षांपासून जळगावकर नागरिकांसाठी आयोजित करण्यात येते. हे आयोजनाचे 9 वे वर्ष आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.