DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

दूध संघाच्या निवडणुकीत माघारीसाठी मनधरणी

जळगाव । प्रतिनिधी

 

 

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (District Cooperative Milk Producers Union) निवडणुकीच्या माघारीसाठी (withdrawal of election) दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. दरम्यान, रविवारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि शिंदे-गटातील (Shinde-group) काही उमेदवारांनी (Candidates)माघारीसाठी मनधरणीचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगत आहे. शेवटच्या दिवशी कोण-कोण माघार घेणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे, भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात काही दिवसांपूर्वी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलच्या आशा धुसर झाल्या आहे. आता आमदार एकनाथराव खडसेंना आव्हान देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे दोन मंत्र्यांसह आमदारांनी मोट बांधली आहे.

आता, भाजपा- शिंदे गटाविरुध्द महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत रंगण्याची चिन्हे दिसत आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 20 जागांसाठी दि. 10 रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण, आ.संजय सावकारे, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील यांच्यासह दिग्गज उमेदवार रिंगणात उभे आहेत. सोमवार दि. 28 रोजी माघारीसाठी अंतीम दिवस आहे. त्यामुळे कोण माघार घेणार आणि कोण रिंगणात राहणार याविषयी उत्सुकता लागून आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडे 20 जागांवर 32 उमेदवार आहे. तीन ते चार मतदार संघात उमेदवार अधिक असल्याने कोण माघार याबाबतचा निर्णय दि. 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच भाजप-शिंदे गटाकडूनही काहींना माघारीसाठी मनधरणी होणत असल्याची चर्चा सुरु आहे. जिल्हा दूध संघाच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे संयुक्त पॅनल रिंगणात उतरविले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.