DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नामदेवराव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं; पवार कार्यकर्ते आक्रमक

पुणे : राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले असताना मोर्चे, आंदोलने, सभा घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत एल्गार सभा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील आमदारांची घरे जाळण्यात आली होती. तर काही नेत्यांच्या जातीबद्दल बोललं जात होतं. अशातच आता या तापलेल्या वातावरणाने पेट घेतला आहे. सुरू असलेल्या प्रकरणावर शरद पवारांवर सतत टीका करणाऱ्या नामदेवराव जाधवांविरोधात (NAMDEVRAO JADHAV) राष्ट्रवादी शरद पवार (SHARAD PAWAR) गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी नामदेवराव जाधवांच्या तोंडाला काळं फसल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील येरवडा परिसरात भंडारकर इन्स्टिट्यूट परिसरात नामदेवराव जाधव कार्यक्रमासाठी आले असता, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जाधवांवर हल्ला केला आहे. यामुळे नामदेवराव जाधवांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद सुरू आहे. अशा स्थितीत नामदेवराव जाधव शरद पवारांची जात ओबीसी असल्याचा दावा करत आहेत. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला. जाधवांनी पत्राद्वारे माध्यमांना शरद पवार ओबीसी असल्याचा दावा केला होता. जाधवांनी केलेला दावा त्यांच्याच अंगलट आला आहे.

नामदेवराव जाधवांनी पत्राद्वारे शरद पवारांचा ओबीसी उल्लेख केल्याने कार्यकर्ते संतापले. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या घोषणा केल्या आहेत. देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो! घोषणा देत जाधवांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. यावेळी पोलिस घटनास्थळी हजर नव्हते, पण काहीच वेळात पोलिस तेथे दाखल झाले असून त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नामदेवराव करत असलेले आरोप हे चुकीचे असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणं असून पोलिसांनी कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर नामदेवराव जाधवांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जाधव कोणती प्रतिक्रिया देतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

नामदेवराव जाधवांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
शरद पवारांवर नामदेवराव जाधवांनी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळेंनी हे सर्व हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावर नामदेवराव जाधव काय प्रतिक्रिया देणार. पोलिस काय करणार हे पाहणे महत्वाचं असेल.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.