DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात

विद्यार्थ्यांच्या 37 प्रकल्पांचे अजित जैन यांच्याहस्ते उद्घाटन

जळगाव : प्रतिनिधी 

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सहज सुलभ होते. रसायनशास्त्र, भौतीक शास्त्र आणि जीवशास्त्र यांची प्रचिती आपल्या दैनंदिन जीवनात पदोपदी मिळत असते. विद्यार्थ्यांनी सादर केलेले सर्वच प्रकल्प स्पृहनिय आहेत असे गौरोद्गार जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी सांगून अनुभूती निवासी स्कूल तशी हरित शाळा म्हणून भारतात प्रसिद्ध आहे या जोडीला लवकरच बॉटनीकल गार्डन विकसीत करण्यात येईल व त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येईल. असे सांगून राष्ट्रीय विद्यान दिनी स्कूलमधील 5 वी ते 8 व्या इयत्तेतील विद्यार्थ्यांनी मांडलेले विज्ञान मॉडेल, प्रोजेक्टचे अवलोकन करून विद्यार्थ्यांकडून ते समजावून घेतले. या राष्ट्रीय विज्ञानाचे औपचारिक उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, शास्त्र, गणिताचे शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून विद्यार्थांच्या कल्पकतेला वाव देत संशोधात्मक वृत्ती यातून जोपासली जाते. मॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण, व्हाइस कंट्रोल ऑन ऑफ सिस्टम यासह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, भौतिकशास्त्रातील प्राथमिक बाबी समजाव्या जेणे करून विद्यार्थी अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपकरणे, मॉडेल, प्रोजेक्ट तयार करतात. यावर्षी 37 निरनिराळ्या प्रकारचे विज्ञान प्रोजेक्ट साकारलेले आहे. त्यातील विशेष उल्लेखनीय असे की, ड्रोन टेक्नॉलॉजी, फ्युचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनिक्स,  बेसिक रोबोटिक्स, स्मार्ट इरिगेशन, ऑटो सेन्सार हॅण्ड सॅनेटायझर, लाय फाय यांचा समावेश आहे. यासोबतच माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित ही सारी प्रोजेक्ट आहेत. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण केले जात आहे. सादरीकरणामधील विशिष्ट विषयांवर प्रश्नोत्तर स्पर्धा घेतली गेली.

आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे महत्त्व आहे व जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी या योगे एक व्यासपीठ मिळालेले आहे.राष्ट्रीय विज्ञान दिन वैज्ञानिक वृत्तीला चालना देख्यासाठी अनुभूती निवासी स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे विद्यार्थी, शास्त्र विषयाचे शिक्षक यांचा हिरिरीने सहभाग आहे. असे स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी प्रतिक्रेयेत सांगितले.

विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प बघण्याची आज संधी

विद्यार्थ्यांमधील नवनवीन कल्पनांना संशोधकदृष्टीने चालना मिळावी, यासाठी अनुभूती निवासी स्कूलमधील प्रोजेक्ट हे इतर स्कूल मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी पाहता येणार आहे. इयत्ता ४ ते ९ मधील विद्यार्थी व त्यांचे पालकांना हे प्रदर्शन दि. १ मार्च ला दुपारी ३ ते ६ या वेळेत अनुभूती निवासी स्कूल येथे पाहता येणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्या पाल्यांमधील संशोधकवृत्तीला हेरून, वैज्ञानिकदृष्टीने त्याला आधार देण्यासाठी जास्तीतजास्त पालकांनीसुद्धा प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.