DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आता सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

जळगाव | प्रतिनिधी

येत्या ११ व १२ नोव्हेंबर रोजी शनिवार, रविवारच्या सुट्ट्या आहेत. त्यास जोडूनच दीपावलीच्या काळात १३ ते १४ नोव्हेंबर दरम्यानही सुट्ट्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणची सर्व वीज बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी दिले आहेत.

या शिवाय, महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थाळावर जाऊन view and pay bill वरही ग्राहकांना वीजबिल भरता येईल. महावितरण मोबाईल ॲपसह इतर सर्वच ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या ग्राहकांना त्यांची वीजदेयके ऑनलाईन भरता येतील.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.