DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स येथे ग्राहक सुविधार्थ खान्देशातील पहिली पझल पार्किंगची व्यवस्था

दिव्यसरथी लाईव्ह न्यूज : जळगाव, दि.२९ एप्रिल २०२३ : रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे नवीन स्वर्णदालन ‘नयनतारा-३’ नुकतेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे. नयनतारा २ भवानी पेठ शोरूमच्या अगदी लागूनच विश्वसनीय परंपरेला आधुनिकतेचा साज देणारे नयनतारा-३ हे शोरूम अनेक अद्भूत सेवा-सुविधांनी सुसज्ज असून खान्देशातील सर्वात पहिली मल्टी लेव्हल पझल पार्किंग सुविधा दोन्ही शोरूममध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

शहरातील प्रमुख बाजारपेठेत जवळपास सर्वच ठिकाणी ग्राहकांची सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे वाहन पार्किंगची. वाहन पार्क करण्यासाठी नागरीकांना नको तो मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच कार किंवा मोठे वाहन असल्यास आपल्या वाहनाला सुरक्षित ठिकाणी पार्क करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. जागेचा अभाव आणि प्रचंड गर्दी यामुळे व्यवस्थापनाची देखील नामुष्की होते. या समस्येवर तोडगा म्हणून रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स ने भवानी पेठ येथे दोन्ही शोरूमला लागूनच आधुनिक अशी स्वयंचलित पझल पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हायड्रॉलिक तंत्रज्ञानावर आधारित या पार्किंगमध्ये चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्यात आले आहेत.तर याच पझल पार्किंगच्या बेसमेंटला दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे. शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून शोरूमचे कर्मचारी चार चाकी वाहन ताब्यात घेतात व तिला हायड्रॉलिक रॅम्पच्या सहाय्याने वरच्या मजल्यावर असलेल्या जागेत पार्क करतात. तसेच ग्राहकांची खरेदी पूर्ण झाल्यावर त्यांचे वाहन पुन्हा गेटवर आणून ग्राहकाच्या स्वाधीन केले जाते. यामुळे ग्राहकांचा वेळ तर वाचतोच शिवाय त्यांचे वाहन ऊन, ट्रॅफिक, यांसारख्या समस्येपासून सुरक्षित राहते‌. पझल पार्किंग सुविधेच्या निमित्ताने रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांना सुवर्णखरेदीचा सुखद अनुभव मिळणार हे नक्कीच.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.