DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सिहोरहून परतीचा प्रवास; भुसावळाती तरुणाचा मृत्यू

जळगाव : सिहोर (मध्‍यप्रदेश) येथील कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सव व शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. या महोत्‍सवात भाविक मोठ्या संख्‍येने गेले. असेच जळगाव जिल्‍ह्यातील काही भाविकांना घेवून गेलेल्या भुसावळातील तरुणाचा अपघातात मृत्यू झाला.

मंगल पाटील (वय ४२) असे मयत तरुणाचे नाव आहे. खंडवा शहरापासून काही अंतरावर १७ फेब्रुवारीला झालेल्‍या अपघात झाला. मंगल पाटील हा भुसावळ शहरातील कृष्णनगरात वास्तव्यास होता. मध्यप्रदेशातील खाजगी लक्झरीवर क्लीनर म्हणून तो कामास होता. सिहोर येथे आयोजित कथा व रूद्राक्ष महोत्‍सवास मंगल हा खाजगी ट्रॅव्‍हलने भाविकांना घेवून गेला होता. मात्र सिहोर येथून परतीचा प्रवास करत असताना खंडवा शहरापासून काही अंतरावर अपघातात ही दुर्देवी घटना घडली.

 

परतीच्‍या प्रवासात गमावला प्राण

परतीचा प्रवास करत असताना भाविक महामार्गावरील एका हॉटेलवर नास्ता करण्यासाठी थांबले. यावेळी हॉटेलमध्ये काही वस्तू राहिल्याने ती घेण्यासाठी मंगल रस्ता ओलांडत होता. याचवेळी दुसऱ्या एका लक्झरीने त्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, मुले, आई, वडील असा परीवार आहे. मंगल हा घरातील कमावता पुरूष होता. मंगलच्या मृत्यूने कुटूंबावर मोठे संकट ओढवले आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.