DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

Rocky aur rani ki prem kahani: सिनेमातील रणवीर-आलियाचा फर्स्ट लूक आला समोर

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर  ‘रॉकी और रानी की प्रेम काहानी’ सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. ‘गली बॉय’ या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर आलिया आणि रणवीर पुन्हा एकदा आपला जलवा प्रेक्षकांना दाखवण्यास सज्ज होत आहे. फिल्ममेकर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या  ‘रॉकी और रानी की प्रेम काहानी’ सिनेमाच्या फर्स्ट शेड्यूलला सुरूवात झाली आहे. करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवर सिनेमाचं शूटींग सूरु झालं असल्याची घोषणा केली आहे. करणने सिनेमाबाबत एक पोस्ट शेअर करत लिहले आहे की, ” शेवटी हा दिवस उजाडला. या क्षणी माझ्या डोक्यात अनेक विचार घोळत आहेत. आणि सर्वात पहिला विचार आहे तो म्हणजे आभार मानणे, आज आम्ही सिनेमाच्या पहिलं शेड्यूल सुरू करत आहोत. आम्हां सर्वांना तुमच्या  प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे. रोल करण्याची वेळ आली आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने देखील तिच्या सोशल मीडिया अकांऊडवर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाच्या बिहाइंन्ड द सिन व्हिडिओ शेअर करत ‘Too many feels to fit in a caption’ असं कॅप्शन दिलं आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा सिनेमातील लूक या व्हिडिओमध्ये रिवील करण्यात आला आहे. रणवीर फार कॅजुअल लूकमध्ये दिसत असून आलिया भट्ट ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. टरॉकी और रानी की प्रेम कहनीट मध्ये धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी या दिग्गज कलाकारांची फळी झळकणार आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.