DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी धनश्री जाधवची निवड

जळगाव : प्रतिनिधी 

ओडीसा येथील के.आय.एस.एस. विद्यापीठ, भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या बी.टेक सिव्हिल द्वितीय वर्षाच्या धनश्री राजू जाधव या विद्यार्थिनीची  निवड करण्यात आली आहे. धनश्री जाधव हि  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे भुवनेश्वर येथे होणाऱ्या  जलतरण  स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार असून ही स्पर्धा २६ ते २९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. धनश्री जाधव या विद्यार्थिनीला रायसोनी महाविध्यालयाचे क्रीडा संचालक जयंत जाधव तसेच क्रीडाशिक्षक राहुल धुळणकर व ममता प्रजापत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले .

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.