श्रीराम मॅक्रो व्हिजन अकॅडमीचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
रावेर : श्रीराम मॅक्रो व्हिजन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी भारतीय संस्कृती व एकात्मता या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला ‘कलांजली’ हे नाव देण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार बंडू कापसे, अप्पर तहसीलदार मयूर कळसे, पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, शिक्षणाधिकारी जी प जळगाव विकास पाटील, गट विकास अधिकारी श्रीमती दिपाली कोतवाल, जे. के पाटील यांच्यासह प्रतिष्ठीत डॉक्टर, जेष्ठ पत्रकार, वकील, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्वागत ढोल ताशांच्या जल्लोषात करण्यात आले. तसेच ‘अतिथी देवो भव’ या उक्तीनुसार तिलक करण्यात येऊन सरस्वती पूजन करण्यात आले.
‘कलांजलीत` विद्यार्थ्यांच्या अनेक कला व गुणांचा संगम प्रत्येक कार्यक्रमातून दिसून येत होता. स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा आविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले.
हे स्नेहसंमेलन अंतर्मुख करणारे नक्कीच होते कारण यात विविधतेतून एकता, भारतीय संस्कृती तसेच ज्वलंत प्रश्न म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया आणि याला जोड होती ती मनोरंजनाची. मॅक्रो व्हिजन स्कूल ही विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक भक्कम पाया घेऊन उभी आहे. परिपूर्ण विद्यार्थी घडवण्याचे काम या शाळेच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन *प्रमुख अतिथी विकास पाटील आणि दिपाली कोतवाल यांनी आपल्या भाषणातून केले. तसेच शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील यांनी सर्व उपस्थितांना संबोधित करीत आश्वासन दिले की यापुढेही शाळा विद्यार्थी कल्याणासाठी सतत कार्य करत राहणार.
या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, उपाध्यक्ष ऍड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवाले शाळेचे सचिव स्वप्निल पाटील, सहसचिव प्रमोद पाटील, संचालक विनायक पाटील, वनिता पाटील, आशा पाटील, भावना पाटील, धनराज चौधरी, प्रणव पाटील हे देखील उपस्थित होते.
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे, मुख्याध्यापक दीपक महाजन उपमुख्याध्यापक जनार्दन धनगर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरम् ने करण्यात आली. .