महिलेने प्लास्टिकच्या बाळाला दिला जन्म, डॉक्टरांनी उलगडलं याघटनेचं गूढ
मुंबई | वृत्तसंस्था
आई होण्याची प्रत्येक महिलेची इच्छा असते. आपल्या पदरात एक गोंडस मुल असावं जे आपल्याला आई म्हणावं असं महिलांना वाटत असतं, ही भावना खरोखरंच खूप सुंदर असते. पण एका महिलेसोबत एक असा काही प्रकार घडला की पाहून तुम्हाला या प्रकरणार नक्की काय म्हणावं हेच कळणार नाही.
हे उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील प्रकरण आहे येथे एका महिलेने प्लास्टीकच्या बाळाला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकताच त्या रुग्णालयात आणि परिसरात खळबळ उडाली आहे. प्लास्टिकची बाहुली ही आपली लहान मुलगी असल्याचा दावा या महिलेने केला आहे. ते बाळ प्री मॅचुअर असल्याने ते असं प्लास्टीक सारखं जन्माला आलं असल्याचं महिलंच वक्तव्य आहे. मुळात कोणी प्लास्टीकच्या बाळाला जन्म कसा देऊ शकतो? असाच प्रश्न लोकांना पडला आहे. त्यामुळे या प्रकरणाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे.
खरंतर महिलेनं रुग्णालयावर आरोप लावला की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचं बाळ प्री मॅचुअर जन्माला आलं, ज्यामुळे ते असं प्लास्टीक सारखं झालं. मुळात ही बातमी ऐकून डॉक्टरांना देखील धक्का बसला. अखेर चौकशी केली असता या प्लास्टीकच्या बाळाचं गुढं उलगडलं. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला तिच्या “गर्भधारणेच्या” सहाव्या महिन्यात ओटीपोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर तिला इटावा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते, जिथे तिने एका मुलाला जन्म दिला. पण हे मूल मानवी बाळ नव्हतं तर प्लास्टिकची बाहुली होती.
या महिलेने दावा केला आहे की, तिने अकाली बाळाला जन्म दिला होता, ज्यामुळे ती प्लास्टिकची बाहुली झाली. प्लास्टिकचे बाळ झालेल्या या महिलेच्या या प्रकाराची डॉक्टरांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ही महिला गरोदर नव्हतीच आणि तिचं हे बाळ खोटं आहे. या महिलेनं हा सगळा सापळा रचला आहे. डॉक्टरांनी गरोदरपणाशी संबंधित सर्व पेपर्स आणि एक्स-रे तपासले, त्यानंतर तिचे सर्व रिपोर्ट्स बनावट असल्याचं आढळून आलं. वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला नियमितपणे पोटातील संसर्गाच्या उपचारांसाठी आरोग्य केंद्रात जात असे, पण त्याकाळात देखील ती कधीच गरोदर नव्हती. त्यामुळे तिचा दावा हा खोटा आहे.
महिलेनं असं का केलं?
खरंतर ही महिला आई होऊ शकत नव्हती. अशावेळी नातेवाईकांचे टोमणे टाळण्यासाठी तिने हे पाऊल उचललं. महिलेने महिनोन्महिने गर्भवती असल्याचे खोटे नाटक केले आणि त्यानंतर तिने एका बनावट मुलाला जन्मही दिला. या महिलेचे लग्न होऊन बराच काळ लोटला होता आणि ती गर्भवती होऊ शकली नव्हती. त्यामुळे वंध्यत्वाच्या टोमण्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिने ही कथा रचली. या महिलेच्या लग्नाला 18 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण ती गर्भधारणा करू शकली नाही. ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे, जी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.