DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मेहुनबारे येथे ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरी

चाळीसगाव;- तालुक्यातील मेहुनबारे येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे शटर उचकटून आतील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचा घटना उघडकीस आली असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.

मेहुनबारे येथे कुंदन प्रभाकर बाविस्कर वय 45 हे सराफा व्यावसायिक असून त्यांचे स्वामी समर्थ केंद्रा जवळ कुलस्वामिनी ज्वेलर्स नावाचे दुकान असून सात ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते आठ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने 55 हजार रुपये किमतीचे सातशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जोडवे ,चांदीची तार ,१२ हजार रुपये किमतीचे तीन ग्राम वजनाचे सोन्याच्या नाकातील फुल्या असा एकूण 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मोहन बारे पोलीस स्टेशनला कुंदन बाविस्कर यांनी आठ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता फिर्याद दिल्यावर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक जालमसिंग पाटील करीत आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.