स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे वाणिज्य मंडळाचे उदघाटन
जळगाव ;- स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाचे प्रा. सुरेखा पालवे (सिनेट आणि व्यवस्थापन मंडळ सदस्य क.ब.चौ.उ.म.वि.जळगांव) यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समई प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.सुरेखा पालवे यांना उपप्राचार्य के.जी.सपकाळे यांच्या हस्ते शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी प्रा. सुरेखा पालवे यांनी जीवनात आर्थिक साक्षरता महत्त्वाची असून देशाचे जबाबदार नागरिक होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले. याचबरोबर त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयीन जीवनात वाणिज्य शाखेचे कोणकोणते रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत हे सांगून वाणिज्य क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधींसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.करुणा सपकाळे होत्या. तसेच तिन्ही विद्या शाखांचे समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील व प्रा.प्रसाद देसाई व वाणिज्य मंडळ अध्यक्षा प्रा.गौरी अत्तरदे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जयंत इंगळे, प्रास्ताविक प्रा.गौरी अत्तरदे, प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.प्रसाद देसाई तर आभारप्रदर्शन प्रा. लालिथा इलांको यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ.अतुल इंगळे, प्रा.प्रविण महाजन,प्रा. अर्चना जाधव, प्रा.स्वप्नील धांडे, प्रा.निवेदिता जोशी, प्रा.पूजा सायखेडे, प्रा.ज्योती चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी विजय जावळे, जयेश शिंपी,चेतन वाणी विजय ज्ञाने यांनी परिश्रम घेतले.