भाऊबीज का साजरी करतात? जाणून घ्या कथा, महात्म्य व महती
दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स : कार्तिक महिन्याच्या शुक्ल द्वादशी तिथीला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. यंदा भाऊबीज 26 ऑक्टटोबर रोजी साजरी केली जाणार आहे. पंचांग आणि शास्त्रीय नियमांनुसार यंदा भाऊबीज साजरी करण्यासाठी पूजा विधी आणि शुभ मुहूर्त कोणता आहे हे जाणून घेऊया.
भाऊबीज 2022शुभ मुहूर्त
यावर्षी कार्दिक द्वादशी तिथी 26 आणि 27 ऑक्टोबर अशी दोन दिवस आहे. त्यामुळे भाऊबीज देखील दोन दिवस सारी केली जाणार आहे. बुधावरी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 02.43 वाजेपर्यंत भाऊबीज साजरी करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. परंतु द्वादशी तिथी गुरुवारीही 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 01.18 ते 03.30 पर्यंत असेल. त्यामुळे 26 ऑक्टोबरला भाऊबीज साजरी करणे शुभ मानले जाते आहे. परंतु काही ठिकाणी लोक उदय तिथीनुसार सण साजरा करतात. अशा स्थितीत 27 ऑक्टोबर रोजी देखील भाऊबीज साजरी केली जाऊ शकते. गुरुवारी 27 ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी करण्यासाठी 11:07 ते 12:46 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. दोन्ही दिवस तुम्ही परंपरेनुसार आणि मान्यतांनुसार भाऊबीज साजरी करू शकता.
भाऊबीज पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार यमद्वितीयाच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजच्या दिवशी यमराज दुपारी बहिणीच्या घरी आले आणि बहिणीची पूजा स्वीकारून तिच्या घरी जेवले असे मानले जाते. यानंतर वरदानात यमराजांनी यमुनेला यमद्वितीयाच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी जो भाऊ बहिणींच्या घरी येईल आणि बहिणींची पूजा स्वीकारेल तसेच तिच्या हाताने तयार केलेले अन्न खाईल, त्यांना अकाली मृत्यूची भीती राहणार नाही असा आशिर्वाद दिला.यामुळेच यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज दुपारच्या वेळी साजरी करण्याला अधिक महत्त्व आहे.
भाऊबीज पूजा विधी
भाऊबीज म्हणजेच कार्तिक द्वितीया तिथीला मृत्यू देव यमराज, यमदूत आणि चित्रगुप्त यांची पूजा करावी असे सांगितले जाते. तसेच या दिवशी यमराजाच्या नावाने अर्घ्य देणे शुभ मानले जाते. भाऊबीजेला दिवाळी प्रमाणे दिवे दान करण्याची प्रथा आहे. त्यामुळे या दिवशी देखील अनेक ठिकाणी यमराजाच्या नावाने तेलाचे दिवे लावले जातात.