विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
वरणगाव | प्रतिनिधी
दिपनगर जवळील कपील वस्तीत घरावरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे टाकात असताना घरा शेजारील विजेच्या ताराला त्याचा स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि २९ गुरुवार रोजी सकाळच्या सुमारास घडली.
वरणगाव पासून जवळ असलेल्या व पोलीस स्टेशन हद्दीतील कपील वस्तीतील रहिवाशी अरविंद मधुकर बाविस्कर (२० ) हा तरुण पावसाळा सुरू झाल्याने घर गळतीमुळे आपल्या राहत्या घरा वरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे टाकण्याचे काम करीत असताना पत्रा खाली ठेवलेला लोखंडी पाईप बाहेर काढीत असताना नकळत घरा शेजाराच्या जाणाऱ्या विज पुरवठा असलेल्या तराला पाईपाचा स्पर्श झाल्याने त्याला जबर धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
घटना घडताच शेजारील नागरिकांनी त्याला घटना स्थाळा वरून उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ क्षितिजा हेडवे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला रमेश मोतीराम चव्हाण यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनाचा तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहे