DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज जळगाव दौऱ्यावर

जळगाव | प्रतिनिधी
केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री ना. नितीन गडकरी यांचा आज जिल्हा दौरा असून सदर दौऱ्याची सुधारित कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे.
शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ०३:३० मिनिटांनी धुळे येथून विशेष विमानाने ना. नितीन गडकरी यांचे जळगावकडे प्रयाण होणार असून ०४:१० मिनिटांनी जळगाव विमानतळावर आगमन व प्रेसिडेंट कॉटेज एमआयडीसी कडे प्रस्थान. दुपारी ०४:२० ते ५ वाजेपर्यंत राखीव. सायंकाळी ५ ते ०५:३० या वेळेत भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांसोबत प्रेसिडेंट कॉटेज रिसॉर्ट, एमआयडीसी येथे संवाद साधून मार्गदर्शन करणार आहे. सायंकाळी ०५:४५ ते ०६:४५ या वेळेत शिवतीर्थ मैदान जिल्हा कोर्टासमोर राष्ट्रीय ‘महामार्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमानंतर ०७:१५ ला जळगाव येथून विशेष विमानाने नितीन गडकरी नागपूरकडे प्रयाण करतील.
जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर नितीन गडकरी मार्गदर्शन करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावेळी भाजपचे खासदार, आमदार तथा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.