जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी अनुभवला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार ‘सांधण व्हॅली’
सह्याद्रीच्या कुशीतील ‘सांधण व्हॅली’ येथे संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली साहसिक व शैक्षणिक सहलीचे आयोजन ; विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए व एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची साहसिक व शैक्षणिक सहल अहमदनगर जिलह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणं घेत जाणारी “सांधण व्हॅली” येथे नुकतीच जाऊन आली. या सहलीमध्ये एकुण १०२ विद्यार्थी – विद्यार्थिनी व ४ प्राध्यापकानी सहभाग नोंदविला. सुरवातीला विध्यार्थ्याना ‘सांधण दरी’ला पोहचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठाने साम्रद या गावी जावे लागले. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ‘सांधण व्हॅली’चा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेली असून याच बाबीचा मागोवा घेत जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हि साहसिक व शैक्षणिक सहल आयोजित केली होती. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आउटबाउंड एक्टिविटी घेत त्यांच्यात टीम कम्युनिकेशन, नेटवर्किंगची भूमिका, प्रॉब्लम सॉल्विंग स्किल, जोखीम घेणे, जागेवरच निर्णय घेणे, रणनीती तयार करणे, क्षमता मॅपिंग, आव्हान हाताळणे, वेळेचे व्यवस्थापन, शिस्तीचे महत्त्व, ऐकण्याच्या कौशल्यांचे महत्त्व, कम्फर्ट झोन तोडणे, शारीरिक मर्यादांवर मानसिक ताकद असणे यासारख्या विविध बाबी आत्मसात करत त्यांनी फुलांनी बहरलेल्या हिरव्यागार ‘सांधण व्हॅली’च्या डोंगरावरील वृक्ष, फुलझाडे, वनस्पतींचे निरीक्षण करत विविध प्रजाती जाणून घेत जैवविविधतेचा अभ्यास केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भंडारदरा येथील धरण आणि रंधा धबधबा आदी स्थळांना भेट देत पर्यटनाचा आनंद घेतला. बिबीए विभागप्रमुख प्रा. योगिता पाटील यांनी या सहलीचे नियोजन केले होते तर प्रा.डॉ. विशाल राणा, प्रा.रोहित साळुंखे प्रा. ज्योती जाखेटे व प्रा.सरोज पाटील यांनी या सहलीत सहभाग नोंदवीत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विध्यार्थ्यानी ही सहल यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने त्यांचे रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.