DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बुद्धिबळ स्पर्धेत मुलीमध्ये प्रज्ञा तर मुलामध्ये पुष्कर प्रथम

जळगाव ;- जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १९ वर्षा आतील गटात मुलांमध्ये भुसावळ चा पुष्कर प्रशांत चौधरी तर मुलींमध्ये चोपडा ची प्रज्ञा मुकुंदा सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले.

विजयी प्रथम पाच मुली व मुलांना जैन स्पोर्ट्स अकॅडमी व स्पोर्ट्स हाऊस तर्फे पदक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत १५ तालुक्यातील मुलांमध्ये ४१ तर मुलींमध्ये २१ खेळाडूंचा सहभाग होता. सदर स्पर्धा स्विसलीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्यात आली.

 

पारितोषिक वितरण समारंभ
या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे तथा जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, मुख्य पंच प्रवीण ठाकरे व रवींद्र धर्माधिकारी,आरबिटर नथु सोमवंशी व क्रीडा समन्वयक मीनल थोरात आदींची उपस्थिती होती.

स्पर्धेतील विजेते व विभागीय पातळीवर निवड झालेले खेळाडू.

मुली
प्रज्ञा सोनवणे चोपडा, कल्याणी पाटील धरणगाव, वैभवी चौधरी धरणगाव,
टीना सावकारे रावेर
रोशनी पाटील पाचोरा

मुले
पुष्कर चौधरी डी एस हायस्कूल भुसावळ
विनीत बागुल एस के पवार पाचोरा
विवेक राजपूत आर एल ललवाणी शेंदुर्णी
तन्मय पाटील इंदिरा धरणगाव
जय पाटील सरदार जी जे रावेर

स्पर्धेतील पंच
मुख्यपंच प्रवीण ठाकरे, सहायक पंच नथू सोमवंशी, अभिषेक जाधव व सोमदत्त तिवारी.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.