DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा कार्तिक काला श्रीक्षेत्र आपेगाव येथे प्रारंभ

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे पैठण :श्री संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली यांची जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव येथे ७२६ वा संजीवन समाधी सोहळा दि.१५/११/२०२२ ते दि.२२/११/२०२२ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. ।ज्ञानदेवी घेतले दान। ह्रदयी धरूनिया ध्यान ।। समाधी बैसला निर्वाण.। कथा कीर्तन करितो ।। कार्तिक काला यात्रा महोत्सव दिनांक १५ /११ /२०२२ वार मंगळवार रोजी ब्रह्मलीन कैवल्यमूर्ती विष्णू महाराज कोल्हापूरकर (गुरुजी) यांच्या आशीर्वादाने अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर (दादा) (अध्यक्ष ज्ञानेश्वर मंदिर श्रीक्षेत्रआपेगाव) यांच्या डोळस नेतृत्वाने उत्साहात प्रारंभ होत आहे. या सप्ताहात दैनिक कार्यक्रम पहाटे ४ ते ५ काकडा भजन, ५ ते ६ माऊलींचा महाभिषेक ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते ८ 10 ज्ञानेश्वरी पारायण, अमृतानुभव चांगदेव पासष्टी, १० ते १२ बाळ क्रीडा गाथा भजन, ४ ते ५ ज्ञानेश्वरी प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, ८ ते १० हरि कीर्तन, १२ ते 3 हरीजागर असणार आहे या महोत्सवात ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक ह भ प राम महाराज तांबे तसेच बाळक्रीडा गाथा भजन ह भ प योगेश महाराज सोन्ने सह या सोहळ्यास महान कीर्तनकार याचे किर्तन होणार आहे. दि. १५/११/ 2022 ह भ प दादा महाराज पाटील (वारकरी शिक्षण संस्था लाडगाव ) १६/११/2022 ह भ प नाना महाराज काकडे (वारकरी शिक्षण संस्था पैठण) १७/११/2022 ह भ प चांगदेव महाराज काकडे (कंडारी ) १८/११/2022 ह भ प महंत महादेव महाराज गिरी( अंतरवाली) १९/११/2022 रामायणाचार्य राजेंद्र महाराज वाघमारे (गोंदी ) २०/११/2022 भागवताचार्य प्रशांत महाराज खानापूरकर २१/११/2022 भागवताचार्य शिवाजी महाराज खवणे (सेलू ) यांचे किर्तन होतील तसेच दिनांक २२/११/ सकाळी ९ ते १२ अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर (दादा )यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल या सोहळ्यामध्ये काकडा भजन ह भ प राजेंद्र महाराज चोरडिया (संभाजीनगर ) ह भ प कल्याण महाराज तांबे, ह भ प बाबासाहेब महाराज भुतेकर, रघुनाथ महाराज कदम, मृदंगाचार्य ऋषिकेश गणेश महाराज तराशे, अर्जुन महाराज काळे, गायनाचार्य माऊली महाराज खवणे,संजय महाराज शिंदे,शंकर महाराज गिरगे,दिगंबर महाराज गिरगे,बद्रीनाथ महाराज गिरगे,कु.किशोरी महाराज खवणे, गोविंद महाराज कुबेर,योगेश महाराज गलधर,रामदास महाराज फलके आदी ज्ञानेश अध्यात्म विद्या संस्थेतील आजी- माजी विद्यार्थी यांचे संगीत भारुडाचा कार्यक्रम होईल. [[तसेच आर एम डी फाउंडेशन पुणे यांच्या साह्याने माऊलींच्या ज्ञानपीठ सभागृहाचे माऊली चरणी अर्पण व लोकर्पण सकाळी ११:०० वाजता विशेषउपस्थिती आर एम डी फाउंडेशनच्या *उपाध्यक्ष> शोभाताई रशिकलाल धारिवाल ज्ञानपीठ संत पूजन पुनीतजी बालन ( अध्यक्ष पुणे बालन ग्रुप तथा अध्यक्ष इंद्राणी बालन फाउंडेशन पुणे ) व त्यांच्या पत्नी जान्हवीताई बालन (धारीवाल) ( अध्यक्षा :आर एम डी फाउंडेशन पुणे) यांच्या शुभहस्ते ज्ञानपीठ सभागृह लोकार्पण सोहळा या सोहळ्यासाठी प्रमुखपाहुणे : महेश साळुंके (आर्किटेक छत्रपती संभाजीनगर) तसेच समस्त ग्रामस्थ भाविक भक्त वारकऱ्यांचे उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे ]] या सोहळ्यात संजीवन सोहळ्याचे विशेष म्हणजे श्री संत ज्ञानराज माऊलींच्या मूर्तीवर किरणोत्सव दिनांक २०,२१, २२,नोव्हेंबर रोजी दुपारी १२:४१ ते १२:५२ वाजेपर्यंत माऊलींच्या मुखार्विंदावर सूर्यकिरण (विराजमान )दर्शन होणार आहे हा किरणोत्सवाचा अनुभव गत वर्षीच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये सर्व भाविकांनी याचि देही याचि डोळा घेतला.सन २०२१ च्या सोहळा दिवशी सकाळपासून सुर्य ढगाआड होते सुर्यदर्शन होत नव्हते पण दुपारी ठीक १२;५० वा सुर्यदेव काळोख,ढगातुन आगमन झाले ते माऊलींच्या मुखार्विंदावर किरणोत्सव केला आणि पुन्हा दिवसभर सुर्यदेव ढगाआड गेले.तसाच अनुभव यावर्षी सुद्धा घ्या.ही अध्यात्म आणि विज्ञान यांचा अलौकिक साक्षात्कार याचि देही याचि डोळा बघा. [ भजन सम्राट सदानंद महाराज मगर (पैठण) संगीतरत्न रामेश्वर महाराज देशमुख संगीत अलंकार प्राध्यापक गणेश महाराज आव्हाड यांचे दुपारी १२:३० ते २:३० वाजता *संगीत जुगलबंदीचा कार्यक्रम असून तदनंतर सायंकाळी ४:३० वाजता अध्यात्मविवेकी गुरुवर्य ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर (दादा ) यांच्या शुभहस्ते दहीहंडी चा कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी ७ वाजता संत ज्ञानराज माऊली, माता रुक्मिणी आई-पिता विठ्ठलपंत यांची पालखी नगर प्रदक्षिणा होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्त वारकरी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प.अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा माऊली जन्मसंस्थान आपेगाव यांनी केले आहे

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.