“१.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले; सरकारवर रोहिणी खडसेंचा घणाघात”
मुंबई – सरकारने राज्यातील तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवल्याबद्दल राष्ट्रवादीच्या (शप) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे.
सरकारने राज्यातील तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवल्याबद्दल राष्ट्रवादीच्या (शप) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे. खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर हा घणाघात केला आहे.
खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, राज्य विधिमंडळात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि तज्ज्ञ मंडळी यावर भाषणे ठोकतील. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने आतापर्यंत तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे ? असा प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे.