पाळधीत गुलाबभाऊंवरील जनप्रेमाचा महासागर; वाढदिवसानिमित्त ५ हजारांहून अधिक शुभेच्छुकांची उपस्थिती
पाळधी, ता. धरणगाव : राजकारणात अनेक नेते असतात, पण जनतेच्या हृदयावर राज्य करणारे नेते फार थोडे असतात. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथे लोकप्रेमाचा अक्षरशः महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जी.पी.एस. कॅम्पस हायस्कूलसमोरील विशाल पटांगणावर सकाळी साडेसात वाजल्यापासूनच शुभेच्छुकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. दुपार, संध्याकाळ आणि रात्रीपर्यंत सुरू राहिलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात तब्बल पाच हजारांहून अधिक मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे सलग दहा तास गुलाबभाऊंनी प्रत्येक शुभेच्छुकाला हसतमुखाने भेटत शुभेच्छा स्वीकारल्या.
ज्ञानदानाचा अभिनव उपक्रम
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सामाजिक विचारांची प्रचिती यंदाच्या वाढदिवसालाही आली. हार, फुले आणि दिखाऊ भेटवस्तूंना फाटा देत हजारो शुभेच्छुकांनी 30 हजारांहून अधिक वह्या, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तू भेट देऊन वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शुभेच्छुकाला एक झाड देण्यात आले. ‘एक झाड… भावी पिढ्यांसाठी जीवनाचा श्वास’ हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. याचवेळी पाळधी परिसरात भव्य ‘ऑक्सिजन पार्क’ उभारण्या त येणार असून त्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.. बारा ते पंधरा फूट उंचीची मोठी झाडे लावून भविष्यात हा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला.

दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप
वाढदिवसाच्या निमित्ताने समाजहिताचे अनेक उपक्रम राबविण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. शुभेच्छुकांनी गुलाबभाऊंवर प्रेमाचा वर्षाव करत विविध पारंपरिक पद्धतींनी त्यांचा सत्कार केला. कुणी पुणेरी पगडी बांधली, कुणी राजस्थानी साफा चढविला, तर कुणी वारकरी वेश, शाल, श्रीफळ, फेटे आणि गांधी टोपी देऊन सन्मान केला. काहींनी तर हनुमानाची गदा भेट देत त्यांच्या लढवय्या नेतृत्वाचा गौरव केला. सभास्थळ परिसर पूर्णपणे भगवामय झाला होता. सर्वत्र भगवे झेंडे, आकर्षक बॅनर्स, घोषणांचा गजर आणि शिवसैनिकांचा उत्साह पाहून दसरा मेळाव्याची आठवण होत होती. लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे शाहीर संग्राम जोशी व त्यांच्या टीमने गुलाबभाऊ अभिष्टचिंतन दमदार पोवाड्यांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, शिक्षण मंत्री दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार एकनाथ खडसे यांच्यासह राज्यातील अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी खासदार उन्मेश पाटील, संजय पवार, सरिता कोल्हे-माळी, शोभा चौधरी, रवी कापडणे, अनिल भोळे, पी. एम. पाटील, सुभाष पाटील, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर महाजन, संजय महाजन, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, गोपाल चौधरी यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.