DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार

जळगाव : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त पूज्य ऋषिवर किरीट भाईजी यांचे बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी जळगाव शहरात आगमन होणार असून, त्यांच्या पावन सान्निध्यात तुलसी परिवार, जळगाव यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा भक्तिमय सोहळा छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, जळगाव येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार आहे. कार्यक्रमात पूज्य किरीट भाईजी यांचे स्वागत, गुरुपूजन, गुरुवंदना, आशीर्वचन, ठाकुरजी पूजन, शंका समाधान व प्रश्नोत्तर सत्र, गुरु दीक्षा, प्रत्यक्ष दर्शन तसेच महाप्रसाद वितरण आदी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देश-विदेशात भागवत कथा, रामकथा, शिवमहापुराण तसेच विविध आध्यात्मिक प्रवचनांद्वारे लाखो भाविकांना मार्गदर्शन करणारे पूज्य किरीट भाईजी यांच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ जळगावकरांना या महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे.
गुरुपौर्णिमा महोत्सव पवित्र व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार असून, सर्व धर्मप्रेमी बंधू-भगिनी, भक्त व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुलसी परिवार, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क : नीलकंठ सरोदे, तुलसी परिवार, जळगाव
मो. : ९४२३१ ८७३९०

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.