DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावच्या रुग्णांसाठी हैदराबादची ‘अत्याधुनिक आरोग्यसेवा’ आता अधिक जवळ!

यशोदा हॉस्पिटल्सतर्फे क्रिटिकल केअर, ECMO, लंग ट्रान्सप्लांटसह सुपर स्पेशियलिटी उपचारांची माहिती

जळगाव : जळगाव, उत्तर महाराष्ट्र आणि परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक व सुपर स्पेशियलिटी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने Yashoda Hospitals Hyderabad तर्फे मंगळवारी (१८ ऑगस्ट) जळगाव येथे प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. यावेळी अॅडव्हान्स्ड क्रिटिकल केअर, पल्मोनरी मेडिसिन, ECMO, लंग ट्रान्सप्लांट तसेच विविध विशेष उपचार सुविधांची माहिती देण्यात आली.

यावेळी डॉ. कलाधर एस., सीनियर कन्सल्टंट व HOD, क्रिटिकल केअर मेडिसिन यांनी ARDS Management, ECMO, Tele-ICU, Neuro Critical Care आणि Trauma Care या विषयांवर मार्गदर्शन केले. गंभीर रुग्णांच्या उपचारात वेळेचे महत्त्व अधोरेखित करताना अत्याधुनिक क्रिटिकल केअर सुविधा वेळेत उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. प्रणय साई चंद्रगिरी, कन्सल्टंट पल्मोनरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिन यांनी Interstitial Lung Diseases, Sleep Medicine, Tuberculosis, Lung Cancers तसेच Diagnostic आणि Palliative Bronchoscopic Interventions याबाबत माहिती दिली. फुफ्फुसांशी संबंधित आजारांचे लवकर निदान, योग्य उपचार आणि गरजेनुसार वेळेवर रेफरल यावर त्यांनी विशेष भर दिला.

दरम्यान, श्री. आशुतोष राठौर, In-charge – Central India तसेच श्री. घुफरान अहमद खान, महाराष्ट्रस्थित व In-charge – Marathwada यांनी जळगाव व उत्तर महाराष्ट्रातून हैदराबाद येथे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या Patient Assistance आणि Support Services ची माहिती दिली.

हैदराबाद येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना Hyderabad Railway Station, Hyderabad Airport तसेच प्रमुख बस स्थानकांवरून Yashoda Hospitals पर्यंत मोफत Pick-up आणि Drop सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच किचन सुविधेसह जवळच्या Guest House मध्ये ₹७५० पासून निवासाची सुविधा उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपचारासाठी हैदराबादला जाण्यापूर्वी रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांशी Teleconsultation घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

मराठी आणि हिंदी भाषिक समर्पित कोऑर्डिनेटर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना Admission पासून Discharge पर्यंत संपूर्ण प्रक्रियेत मार्गदर्शन करतात. रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार ट्रेन व विमान तिकीट व्यवस्था तसेच Air Ambulance, Train Ambulance आणि Road Ambulance सेवांच्या समन्वयासाठीही हॉस्पिटलकडून मदत केली जाते.

जळगाव, उत्तर महाराष्ट्र आणि परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांसाठी हैदराबाद येथे जाणे अधिक सुलभ, सोयीचे आणि समन्वयित व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.