पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? महाराष्ट्रातील आजचे दर पाहा
जळगावमध्ये पेट्रोल १०८.७७ तर डिझेल ९५.२८ रुपये प्रतिलिटर
जळगा : पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होत असल्याने वाहनधारकांचे इंधनाच्या दरांकडे दररोज लक्ष असते. वाहतूक खर्चाबरोबरच भाजीपाला, अन्नधान्य, दूध आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही इंधन दरांचा परिणाम होत असतो. त्यामुळे आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये असते. देशातील सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेतील रुपयाचे मूल्य, वाहतूक खर्च तसेच केंद्र व राज्य सरकारचे कर या विविध घटकांचा इंधनाच्या दरावर परिणाम होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फरक दिसून येतो.
जळगावमध्ये पेट्रोल १०८.७७ रुपये
आजच्या उपलब्ध दरानुसार जळगाव शहरात पेट्रोलचा दर १०८.७७ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर ९५.२८ रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत पेट्रोल १११.२१ रुपये, तर डिझेल ९७.८३ रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यात पेट्रोल ११२.०४ रुपये, तर डिझेल ९८.६८ रुपये प्रतिलिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर ११२.४४ रुपये, तर डिझेलचा दर ९९.०७ रुपये आहे. नागपुरात पेट्रोल १११.८० रुपये, तर डिझेल ९८.४८ रुपये प्रतिलिटर आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील इंधन दर
| शहर | पेट्रोल (₹/लिटर) | डिझेल (₹/लिटर) |
|---|---|---|
| जळगाव | १०८.७७ | ९५.२८ |
| धुळे | १०८.०० | ९४.५६ |
| नंदुरबार | १०९.२५ | ९५.७५ |
| नाशिक | ११२.४४ | ९९.०७ |
| पुणे | ११२.०४ | ९८.६८ |
| मुंबई | १११.२१ | ९७.८३ |
| नागपूर | १११.८० | ९८.४८ |
| छत्रपती संभाजीनगर | १११.०३ | ९६.९९ |
| अकोला | १०८.१५ | ९४.७२ |
| अमरावती | १०९.५५ | ९६.०८ |
| कोल्हापूर | १०८.९४ | ९५.४७ |
| सांगली | १०८.७९ | ९५.३२ |
| सोलापूर | १०८.८९ | ९५.४२ |
| सातारा | १०८.७७ | ९५.३० |
| बीड | १०८.४४ | ९५.८४ |
| नांदेड | १०९.८१ | ९६.०८ |
| लातूर | १०९.४२ | ९५.९३ |
| रायगड | १०९.०८ | ९८.५१ |
| ठाणे | १०७.९८ | ९४.४७ |
| यवतमाळ | १०४.१८ | ९४.७६ |
दर जाणून घेण्यासाठी एसएमएसची सुविधाही
आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना तेल कंपन्यांच्या एसएमएस सुविधेचाही वापर करता येतो. इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> हा संदेश ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा. एचपीसीएल ग्राहकांसाठी ९२२२२०११२२, तर बीपीसीएल ग्राहकांसाठी ९२२३११२२२२ या क्रमांकावर एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. इंधनाच्या दरात स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि इतर शुल्कांमुळे शहरनिहाय फरक पडतो. त्यामुळे वाहनधारकांनी पेट्रोल किंवा डिझेल भरताना आपल्या परिसरातील लागू असलेला ताजा दर तपासणे आवश्यक आहे.