DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाने खडसेंचा वाढदिवस साजरा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जळगाव महानगरच्या वतीने लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर व वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या आयोजनातून झालेल्या या उपक्रमात विद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रम प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शासकीय महाविद्यालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच शिवाजीनगर परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या आयोजनातून वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण होते. यावेळी विनायक पाटील, माजी नगरसेवक राजू मोरे, माजी नगरसेवक सुनील माळी, माजी ओबीसी जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, ओबीसी महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे, श्रीराम विद्यालयाचे उपाध्यक्ष बाळाजी सानप, भगवान लाडवंजारी, संचालक संतोष चाटे, मुख्याध्यापक दिवाकर जोशी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी केली. अध्यक्षीय भाषणातून मजहर पठाण यांनी एकनाथराव खडसे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटपाचा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन प्रतिभा पाटील व दिनेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अतुल चाटे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक दिवाकर जोशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.