DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अभिवादन

गांधीजींच्या सत्य-अहिंसेच्या विचारांचे स्मरण; शास्त्रींच्या साधेपणा व देशसेवेच्या कार्याला उजाळा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी आणि जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वाय. एस. महाजन यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वातंत्र्याच्या विचारांसह लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस एजाजभाई मलिक, प्रदेश सरचिटणीस जयप्रकाश चांगरे, जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी, समन्वयक विकासदादा पवार, जळगाव शहर विधानसभा प्रमुख जयप्रकाश महाडिक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गिरीश सांगळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, सरचिटणीस सुहासभाऊ चौधरी, फहरान शेख, सतीश चौव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.