DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीराम विद्यालयाच्या मुली प्रथम

१४ वर्षांखालील मुलींच्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड; मुलांच्या संघाला द्वितीय क्रमांक

जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघानेही उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळविला.

या यशाबद्दल विजेत्या मुलींच्या तसेच मुलांच्या संघाचा विद्यालयात सत्कार करण्यात आला. तसेच खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका सौ. सरस्वती पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अशोक लाडवंजारी आणि संचालक भगवान लाडवंजारी यांच्या हस्ते खेळाडू व क्रीडा शिक्षिकेचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक लाडवंजारी यांनी पुढील स्पर्धांसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत कठोर सराव व सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व सांगितले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.