DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२६ स्पर्धचे आयोजन

भारतातून १५ संघाचा सहभाग; २७० खेळाडू दाखवित कौशल्य

जळगाव : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२६ आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ ते ७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान साखळी पद्धतीने सामने होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन रविवार, दि. ४ ऑक्टोबर ला संध्याकाळी ४ वाजता अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर होईल.
उद्घाटन सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे व पदाधिकारी तसेच काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) चे पदाधिकारी असतील.
सीआयएससीई बोर्डच्या अंडर-१७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये आंध्रप्रदेश-तेलंगणा, महाराष्ट्र, उडिसा, उत्तर पश्चिम भारत, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार व झारखंड, उत्तर भारत, ईशान्य भारत, केरलम्, कर्नाटका व गोवा, छत्तीसगड, तमिळनाडू पॉन्डेचेरी आणि अंदमान निकोबार बेट येथील १५ संघांतील २७० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. साखळी व बाद पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचे अनुभूती निवासी स्कूल मुख्य आयोजक आहेत. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस अकॅडमी मधील सहकारी त्यासाठी सहकार्य करत आहेत.
साखळी सामने प्रत्येकी १५ षटकांचे असतील. तर उपांत्य व अंतिम सामने हे २० षटकांचे होतील. साखळी पद्धतीमध्ये २२ सामने होतील. तर दोन उपांत्य फेरीचे सामने एक अंतिम सामना तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी एक सामना खेळविण्यात येईल. ए, बी, सी, डी अशा चार ग्रृप मध्ये हे सामने होतील. एका ग्रृप मध्ये चार संघांचा समावेश असेल. उपांत्य फेरीत ‘ए’ विरूद्ध ‘डी’ तसेच ‘बी’ विरूद्ध ‘सी’ असे सामने होतील. यातील विजेते अंतिम फेरीसाठी खेळतील. आणि पराभुत संघ तिसऱ्या क्रमांसाठीचा सामना खेळतील.
अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल, जैन ड्रीम स्पेस-मेहरूण तलावाजवळ तसेच एमके स्पोर्टस-सावखेडा चे दोन मैदानांवर सामने रंगणार आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.