DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शिव कॉलनी ते शंभर फुटी रोड होणार ‘मिनी रिंग रोड’!

वाघनगर परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार; रस्ता विकासकामाचे आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

जळगाव : शहरातील वाहतूक व्यवस्था गतिमान करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शिव कॉलनी स्टॉप ते शंभर फुटी रोड या रस्ता विकासकामाचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. वाघनगर परिसर, पीरबाबा दर्गा आणि गाडगेबाबा चौकाला जोडणारा हा मार्ग ‘मिनी रिंग रोड’ ठरणार असून, परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, सभापती चंद्रशेखर पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ११ व ७ मधील नगरसेवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी प्रथम भूमिगत गटारांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत हे काम सुरू होणार असून, त्यानंतर रस्त्याच्या काँक्रिटीकरण व डांबरीकरणाला गती दिली जाणार आहे.

शहराला दर्जेदार पायाभूत सुविधा देणे हेच उद्दिष्ट असून, शिव कॉलनी ते शंभर फुटी रोड हा मार्ग वाघनगरसह मोठ्या लोकवस्तीसाठी मिनी रिंग रोड ठरेल. देवेंद्र फडणवीस, गिरीषभाऊ आणि गुलाबभाऊ यांच्या सहकार्यामुळे निधी उपलब्ध झाला आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.

— राजूमामा भोळे, आमदार, जळगाव शहर

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.