DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

श्री मंगळग्रह मंदिरात २४ नोव्हेंबरला श्री तुळशी विवाह सोहळा

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेस अर्थात मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री तुळशी विवाह सोहळा आयोजित केेलेला आहे. या दिवशी दुपारी १२.१५ वाजता मंगलाष्टके व सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी तुळशी विवाह सोहळा होईल.
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे समाजाभिमुख व काळाची गरज असलेल्या एका उपक्रमाचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ करण्यात आलेला आहे. त्या उपक्रमांतर्गत सर्वांना विवाह सोहळा पूर्णत: विधिवतरित्या आणि पैशांची उधळपट्टी न करता अत्यंत साधेपणाने करण्याबाबतची शपथ देण्यात येते. त्या शपथेच्या अनुषंगानेच मागील काही वर्षांपासून श्री तुळशी विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने मात्र पारंपरिक हिंदू संस्कृतीप्रमाणेच केला जात आहे. यात भव्य सजावट आणि स्नेहभोजन यासाठी संस्था कोणताही खर्च करीत नाही. भगवान श्री विष्णू व श्री लक्ष्मी माता यांचा परम पवित्र विवाह अत्यंत साधेपणाने मात्र पूर्णत: शास्त्रोक्त पद्धतीने होईल. सदर श्री तुळशी विवाह सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने अवश्य उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.