DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

उन्हाळी प्रवाशांसाठी दिलासा! भुसावळमार्गे गोरखपूर-बेंगळुरू ‘समर स्पेशल’ रेल्वे धावणार

भुसावळ – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. यात अजून एका विशेष गाडीची भर पडली आहे. गोरखपूर ते बेंगळुरू दरम्यान ही ‘समर स्पेशल ट्रेन’ धावणार आहे . या ट्रेनला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा असणार आहे.

विशेष रेल्वेच्या फेऱ्या
गोरखपूर-बेंगळुरू गाडी क्रमांक ०६५२९/०६५३० ही समर स्पेशल रेल्वे तीन फेऱ्यांमध्ये धावणार आहे. ०६५२ क्रमांकाची गाडी १२, १९ आणि २६ मे रोजी रोजी बंगळुरू येथील सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल येथून धावणार आहे. तर ०६५३० क्रमांकाची गाडी १६, २३ आणि ३० मे रोजी गोरखपूर येथून धावेल. या गाडीला एकूण २० कोच असतील, ज्यामध्ये १ फर्स्ट एसी, २ सेकंड एसी, ४थर्ड एसी, ७ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ एसएलआर/डी कोच असतील. दरम्यान ही गाडी गोरखपूरवरून येताना भुसावळला पहाटे ३.३५ पोहचेल तर बेंगळुरू येतांना या गाडीची भुसावळसाठी निर्धारित वेळ रात्री ११.१० मी. असेल.

या स्थानकांवर असेल थांबा
या गाडीला, देवरिया सदर, भटनी, मऊ, वाराणसी, प्रयागराज, झांसी, बिना, राणी कमलापती, खांडवा, भुसावळ, मनमाड, दौंड, पुणे, मिरज, बेळगाव, हुब्बल्ली, दावणगेरे, अर्सिकेरे आणि तुमकूर या महत्वाच्या स्थानकांवर थांबेल.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.