DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पुरी रथयात्रेत अफरातफरी: ६०० भाविक जखमी, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

जगन्नाथ रथयात्रा – ओडिशातील पुरी येथे पार पडत असलेल्या जगन्नाथ रथयात्रेदरम्यान शुक्रवारी (२७ जून) रात्री मोठी चेंगराचेंगरी झाली. रथ ओढताना झालेल्या गोंधळात सुमारे ६०० भाविक जखमी झाले असून त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गर्दीमुळे रथयात्रेच्या पहिल्या दिवशी रथाने केवळ ७५० मीटर अंतर पार केले. आज (२८ जून) यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून रथयात्रा पुन्हा सुरू होणार आहे.

रात्रीच्या सुमारास देवी सुभद्राच्या रथाभोवती प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीमुळे ६२५ भाविकांची प्रकृती खालावली, तर अनेक भाविक बेशुद्ध झाले. सुमारे ७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओडिशाचे मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी सांगितले की, “भगवान बलभद्राचा रथ एका वळणावर अडकल्यामुळे रथयात्रेला विलंब झाला. त्यामुळे देवी सुभद्राचा रथ मरीचकोट येथे थांबवावा लागला. सूर्यास्तानंतर रात्री ८ वाजता तिन्ही रथांची हालचाल थांबवण्यात आली.”

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बलभद्राचा रथ सर्वात पुढे होता. सुभद्राचा रथ ७५० मीटरपर्यंतच जाऊ शकला, तर भगवान जगन्नाथांचा नंदीघोष रथ मुख्य मंदिराबाहेर एक मीटरपेक्षाही कमी अंतर हलू शकला.

शुक्रवारी दुपारी ४:०८ वाजता भगवान बलभद्रांचा रथ मुख्य मंदिरातून बाहेर काढण्यात आला. ही यात्रा मुख्य मंदिरापासून २.६ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरापर्यंत नेण्यात येते, जिथे भगवान ९ दिवस राहतात. यानंतर ५ जुलै रोजी ते पुन्हा मुख्य मंदिरात परततील.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.