DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरुवात, जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

जळगाव – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात कांताई सभागृह येथे झाली. पहिल्यांदाच आयोजित ही स्पर्धा आज २८ ते २९ जून दरम्यान होईल. त्याचे उद्घाटन कॅरम खेळून झाले. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे, शिवछत्रपती पारितोषिक विजेते आयशा खान, योगेश धोंगडे व संदिप दिवे यांच्यासह सहा टिमचे सहा संघ मालक उपस्थित होते. जिल्ह्यातील एका संघात पाच खेळाडू असे सहा संघ मिळून ३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यासाठी प्रमुख पंच म्हणून पुणे येथील रहिम खान काम पाहत आहे. मकरा चॅलेंजर संघाचे संघ मालक युसुफ मकरा, आयकॉन खेळाडू सय्यद मोहसीन, नशिराबाद लायन संघाचे संघ सुपडू चौधरी, आयकॉन खेळाडू संदिप दिवे, क्रीडागृहाचे संघ मालक अमिर शेख तर आयकॉन खेळाडू शेख रईस, सालार किंग संघाचे मालक रेहान सालार, आयकॉन खेळाडू अताउल्ला खान, आप्पासाहेब महापुरुष संघाचे मालक ॲड. रवींद्र कुलकर्णी आयकॉन खेळाडू योगेश धोंगडे तर श्रीयुत्तम हर्बल रायडर संघाचे मालक रंगनाथ पाटील आयकॉन खेळाडू नईम अन्सार आहेत.

संघ मालकांचे प्रतिनिधी म्हणून अॅड. रविंद्र कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना जैन स्पोर्टस अॅकडमी व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांचे विशेष कौतूक केले. सय्यद मोहसीन यांच्या परिश्रमामुळे ही स्पर्धा अगदी कमी कालावधीत जळगावात होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिल जोशी म्हणाले की, खेळ, खेळाडूंसाठी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय अतूल जैन यांच्यासह जैन उद्योग समूह नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यातून अनेक खेळाडू घडत असतात. त्यांना रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळेच मन लावून खेळ, खेळता येतो असे त्यांनी सांगितले.

सर्व संघ मालक व खेळाडूंनी यात सहभाग नोंदविला याबद्दल अरविंद देशपांडे यांनी अभिनंदन करीत सांगितले की, जळगाव कॅरम लिग – 2025 ही स्पर्धा पुढे आणखी विस्तारीत स्वरूपात अधिक चांगल्या आयोजनासह घेता येईल अशी ग्वाही दिली. सय्यद मोहसीन यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.