DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विठूमाऊलीच्या नामगजरात दशकपुर्ती सोहळा उजळला!

‘स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान’तर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम; गीत-नृत्य-अभंगवाणीने रसिक मंत्रमुग्ध

जळगाव – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि डॉ. भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन च्या वतीने यंदाचा १० वा अर्थात दशकपुर्ती कार्यक्रम प्रतिष्ठानाने आयोजित केला होता. परंपरेप्रमाणे अनुभूती शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी, दिंडी, व खेळ झाले. दीप प्रज्वलन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी सचिव अरविंद देशपांडे, रायसोनी महाविद्यालयाच्या संचालक डॉ. प्रीती अग्रवाल, व जेष्ट रंगकर्मी प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले आणि सुरू झाला अभंगवाणीचा प्रवास. या कार्यक्रमात खालील माऊलीने गीते सादर केलेत.
१. बासरी मेडली – संहिता जोशी
२. ⁠सुंदर ते ध्यान- नीरजा वाणी
३. ⁠तू वेडा कुंभार – आदित्य देशपांडे
४. ⁠चंद्रभागेच्या तीरी – अनुभूती शाळा
५. ⁠⁠मनी नाही भव- परी पाटील
६. ⁠देव इंद्रायणी थांबला- भूमिका चौधरी
७. ⁠कानडा राजा पंढरी चा – अनुभूती शाळा
८. ⁠नाम तुझे घेता देवा – कुणाल पारे
९. ⁠⁠बोलावा विठ्ठल – संहिता जोशी
१०. ⁠⁠⁠विठू माऊली तू- आरुह्या देशपांडे
११. ⁠तुझे नाव आले ओठी – सर्वेषा जोशी
१२. ⁠जगण्याचे देवा लाभो ऐसे- भार्गवी चौधरी
१३. ⁠ज्या सुखा करणे- आराध्य खैरनार
१४. ⁠धाव घाली आई, अता पाहते काही – काव्या पवार यानंतर काही नृत्य सादर केली गेली. त्यात प्रामुख्याने
१. टाळ बोले चिपळीला – नूपुर चांदोरकर – खटावकर दिग्दर्शित नुपुर नृत्यांगण चे विद्यार्थी – अश्वी अग्रवाल, स्वरा चौधरी, रुद्र कपोते, दुर्वा अग्रवाल, स्वाधी नवाल, लक्ष्मी भोळे, लावण्या कुलकर्णी, कनिष्का कुलकर्णी, अनघा कुलकर्णी, ओवी धानोरकर
२. ⁠बघ उघडूनी दार – प्रभाकर संगीत कला अकादमी सादरकर्ते कलाकार स्मरणिका देवळे, अनन्या यादव, ऋतिका शिरसाळे, कल्याणी भामरे, प्रेक्षा बनवत, आरोही मोरे
३. ⁠दिव्या सोहळा पाहुनी डोळा – सानवी बुर्कुल यांनी नृत्य सादर केले. गुरुवंदना वरूण नेवे यांनी तर सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले. सर्व कार्यक्रमाच्या निरुपणात सर्वात जास्त मजा आली आणि ती म्हणजे दोन छोट्या माऊलीनी निरुपण केले ते म्हणजे व्योम खटावकर व ओवी धानोरकर यांनी. तबला सांगत यज्ञेश जेऊरकर यांनी केली.तर एकूण कार्यक्रम उत्तम झाला. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमासाठी मिळाला.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.