जळगाव बॉक्स क्रिकेट लीग 2025 (सीजन 2)चे यशस्वी आयोजन
जळगाव : IT DigiTech Solutions यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजातील खेळाडूंना एकत्र आणत जळगाव बॉक्स क्रिकेट लीग 2025 (JBCL सीजन 2) चे आयोजन दि. 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी गोरजाबाई टर्फ येथे करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल 16 संघांनी सहभाग घेतला.
सर्व संघांमध्ये खेळाडूंची निवड ग्रेडनिहाय समान पद्धतीने झाल्याने स्पर्धेला चुरशीचे स्वरूप लाभले.
स्पर्धेतील विजेतेपद रे फाउंडेशन संघाने पटकावले.
-
उपविजेता : ट्रिपगुरु टूरिझम
-
तृतीय क्रमांक : महाजन बेकर्स
-
चतुर्थ स्थान : स्पार्टन
सर्व विजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पॉन्सर्ससह JBCL आयोजन समितीतील अक्षय पाटील, गणेश पाटील, हितेश मराठे, माही जाधव, स्वप्नील पाटील, ऋषिकेश पाटील, कल्पेश बाविस्कर, राहुल कदम आणि मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेत काटेकोर नियोजन केले.