DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पाचोरा शहरात अवैध शस्त्र विक्रीचा डाव पोलिसांनी उधळला ; १८ तलवारींसह एकाला अटक

पाचोरा शहरात अवैध शस्त्र विक्रीचा डाव पोलिसांनी उधळला ; १८ तलवारींसह एकाला अटक
पाचोरा पोलिसांची कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात अवैध शस्त्र विक्रीचा डाव पोलिसांनी उधळला. माहिजी नाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका इसमाला रंगेहाथ पकडत तब्बल १८ तलवारी जप्त केल्या. या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून, जप्त शस्त्रांची किंमत अंदाजे ५४,००० रुपये आहे.

दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात एक इसम तलवारी विक्रीसाठी घेऊन आला आहे. तत्काळ पोलिसांनी सापळा रचून सोहेल शेख तय्युब शेख (वय २४, रा. स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून १८ तलवारी जप्त करण्यात आल्या, ज्या त्याने विक्रीसाठी लपवून ठेवल्या होत्या. याशिवाय, त्याने काही तलवारी आधीच विक्री केल्याचेही उघड झाले.

या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक ४६०/२०२५ नोंदवण्यात आला असून, आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) सौ. कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, पोकॉ संदीप राजपूत, जितेंद्र पाटील आणि हरीष परदेशी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.