DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन 

सोन्याचे दागिने व डायमंड्सची नवी श्रेणी ग्राहकांसाठी उपलब्ध

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन 

सोन्याचे दागिने व डायमंड्सची नवी श्रेणी ग्राहकांसाठी उपलब्ध

जळगाव (प्रतिनिधी) : शहराच्या रिंगरोडवर ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ अधिक भव्य आणि आकर्षक स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत येत आहे. सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर या नव्या शोरूमचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यास राजकारण व समाजकारणातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गेल्या चार वर्षांपासून ‘हाऊस ऑफ ज्वेल्स’ हे चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य व कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. ग्राहकांच्या प्रेम व मागणीमुळे बाफना परिवाराने आता सोन्याचे दागिने व डायमंड्सची विस्तृत श्रेणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी आपले पूर्वीचे शोरूम (गंगाई बिल्डिंग, रिंग रोड) सोडून समोरच पंचरत्न टॉवर, जेडीसीसी बँकेसमोर, रिंग रोड येथे नवे, प्रशस्त व आकर्षक शोरूम उभारले आहे.

सोमवार, दि. २२ सप्टेंबर ते बुधवार, दि. २ ऑक्टोबर (विजयादशमी) या कालावधीत ‘विशेष उद्घाटन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला माजी मंत्री सुरेश जैन, माजी खासदार ईश्वर ललवाणी, उद्योजक अशोक व ज्योती जैन, नयनतारा बाफना, खासदार स्मिता वाघ, पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू भोळे, भागवत भंगाळे, भरत अमळकर, गोसेवक अजय ललवाणी, ॲड. नारायण लाठी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या नव्या शोरूममध्ये सोन्या-चांदीसोबत हिरे, पोल्की, जडाऊ, प्लॅटिनम व राशीरत्नांचे आकर्षक दागिने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांनी या विशेष उद्घाटन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील कस्तूरचंद बाफना, अभिषेक सुनील बाफना व ऋषभ सुनील बाफना यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.