DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार

जळगाव : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदी आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सभा घेण्यात येतात.

राज्य निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार मुक्ताईनगर पंचायत समितीसाठी 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली होती.तथापी, मुक्ताईनगर पंचायत समिती करीता आरक्षण सोडत काढतांना चुकीची झाल्याने आरक्षण सोडत नव्याने काढण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

या अनुषंगाने मुक्ताईनगर पंचायत समितीकरिता नव्याने आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष सभा दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय, मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांना या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वेळेत सभास्थळी हजर रहावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिद्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.