जळगाव महापालिका निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ
आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे अधिकृत रणशिंग फुंकण्यात आले असून आजपासून (ता. २२) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. महापालिकेच्या १९ प्रभागांतील एकूण ७५ जागांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रशासनाने महापालिकेच्या सतराव्या मजल्यावरील इमारतीत आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक अधिकाऱ्यास प्रभागनिहाय स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. संबंधित प्रभागातील उमेदवारांनी त्याच कार्यालयात अर्ज दाखल करावयाचे आहेत.

दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांचे वाटप व स्वीकृती करण्यात येणार आहे.
प्रभागनिहाय अर्ज स्वीकृतीसाठी मजला क्रमांक
-
जितेंद्र पाटील (उपविभागीय अधिकारी) – मजला क्रमांक २, अ विंग
प्रभाग क्रमांक १, २, ३ -
निवृत्ती गायकवाड (उपजिल्हाधिकारी) – मजला क्रमांक २, अ विंग
प्रभाग क्रमांक ४, ५, ६ -
जितेंद्र कुवर (अधिकारी, जिल्हा पुनर्वसन) – मजला क्रमांक २, ब विंग
प्रभाग क्रमांक ७, ११, १२ -
महेश चौधरी (जिल्हा पुरवठा अधिकारी) – मजला क्रमांक २, ब विंग
प्रभाग क्रमांक १३, १४, १८, १९ -
विजय सूर्यवंशी (अप्पर चिटणीस) – मजला क्रमांक ११, ब विंग
प्रभाग क्रमांक १५, १६, १७ -
विनय गोसावी (उपविभागीय अधिकारी) – मजला क्रमांक ११, ब विंग
प्रभाग क्रमांक ८, ९, १०