DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रेल्वेत भीक मागणाऱ्या महिलेवर अत्याचार

अमळनेर | अमळनेर तालुक्यातून मानवतेला काळिमा फासणारी एक गंभीर व संतापजनक घटना समोर आली आहे. रेल्वेत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एका युवकाने अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मध्यप्रदेशातील २८ वर्षीय मागासवर्गीय पीडिता ही रेल्वे प्रवासादरम्यान भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत होती. या दरम्यान अमळनेर येथे तिची ओळख आरोपी युवकासोबत झाली. पुढे ही ओळख वारंवार भेटींमध्ये बदलली. तपासात आरोपी तिला जेवण व काही पैसे देत असल्याचे समोर आले आहे.

६ तारखेला सकाळी पीडिता बऱ्हाणपूरहून रेल्वेने धार येथे पोहोचली असता, आरोपीने तिला रेल्वेतून उतरवून घेतले. त्यानंतर मोटारसायकलवरून मित्रासह तिला धार येथील एका दर्ग्याजवळ नेण्यात आले. तेथील निर्जन ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या झोपडीत आरोपीने मद्यप्राशन करून पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली.

पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यावर मारहाण करत जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपीने तिला पुन्हा रेल्वे स्थानकावर सोडून दिले. मानसिक व शारीरिक त्रास सहन करत पीडितेने अमळनेर पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार उघड केला.

 

घटनास्थळ मध्यप्रदेशातील पोलीस हद्दीत येत असल्याने संबंधित पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमे तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.