दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड आधारशी संलग्न करावे – तहसीलदारांचे आवाहन
जळगाव – जळगाव ग्रामीण तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०२५ नुसार आपले UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे अनिवार्य असल्याची माहिती तहसीलदार डॉ. शीतल राजपूत यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी आपले UDID कार्ड व प्रमाणपत्र, अद्यावत आधार कार्ड आणि बँक पासबुकसह २० फेब्रुवारी २०२६ पूर्वी तहसील कार्यालय, जळगाव येथील संजय गांधी योजना शाखेत कागदपत्रे सादर करून माहिती अद्यावत करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात ₹२५०० अनुदान जमा झाले आहे, त्यांनीही अनिवार्यपणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार, कागदपत्रांची पडताळणी करून माहिती अद्यावत न करणाऱ्या लाभार्थ्यांच्या प्रकरणात पुढील कार्यवाही शासन नियमांनुसार करण्यात येईल, असेही तहसीलदारांनी सांगितले.