DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जन्मदात्या पित्याकडून अवघ्या ९ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

चाळीसगाव : प्रतिनिधी 

 

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातून बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे आपल्याच ९ वर्षीय मुलीवर नराधम बापाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम पित्यास अटक करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. तिच्या घरची हलाखीची परिस्थिती असून पीडित मुलीची आई आजारी असल्याने व घरात सलाईन लावण्यासाठी जागा नसल्याने दिराच्या घरी सलाईन लावण्यासाठी गेल्याने नऊ वर्षीय चिमुकली घरात असतानाच नराधम बापाने तिच्यावर अतिप्रसंग केला. आई घरी आल्यावर घाबरलेल्या पीडीतेने हा प्रकार सांगितला. दिड महिन्यापूर्वीही या नराधम बापाने असाच प्रकार केल्याची माहिती पीडिताने सांगितल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. या प्रकाराचा जाब घरच्या लोकांनी विचारल्यानंतर हा नराधम पळाला. याबाबत पीडीतेच्या आईने चाळीसगाव शहर पोलिसात सोमवारी रात्री तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम पित्याला अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.