सुट्टीमध्ये सहकुटुंब फिरायला जाण्यासाठी बेस्ट ठिकाणे कोणती?
दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क : उन्हाळा जसा उष्णता घेऊन येतो तसा सुट्ट्या देखील घेऊन येतो. लगेच कुटुंब, मित्र किंवा नातेवाईकांसोबत कुठे तरी फिरायला जायचे हे ठरवू लागतात.या सुट्ट्यामध्ये नेमके फिरायला जाण्याच्या ठिकाणाचे समीकरण साधने खूप महत्वाचे असते. यामध्ये अनेक लोकांची गफलत होऊ शकते. तुमचा हा ताण कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशी पाच ठिकाणे सांगणार आहोत . ज्यामुळे तुम्ही तुमची सुट्टी अगदी मजेदार तसेच आनंददायी घालवू शकाल आणि सहकुटुंबासोबत मिळू शकेल सर्वाधिक आनंद . तर चला ती ५ ठिकाणे कोणती आहे हे पाहू.
गोवा – गोवा जरी छोटे राज्य असले तरी समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे . समुद्रकिनारा , अविस्मरणीय सूर्यास्त असं बरच काही अनुभवायचे असेल तर गोवा सारखे ठिकाण नाही . अनेक देशी तसेच विदेशी पर्यटक तेथे जाऊन विविध गोष्टीचा आनंद घेत असतात . आज आम्ही तुम्हाला गोव्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणाची माहिती देणार आहोत .
गोव्यामध्ये प्रमुख ठिकाणांना देऊ शकता भेट – बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच असल्यामुळे तुम्हाला त्या चर्चला भेट देता येईल . ज्यांना बीच तसेच समुद्राच्या लाटा अनुभवायच्या असतील. तर त्यांच्यासाठी दोना पावला बीच , मोरमार बीच, कळंगूट बीच तसेच मोराजी बीच असे छोटे-मोठे बीच पाहण्यास मिळतील . खूप लोकांना ट्रेक करायला आवडते. त्यांच्यासाठी अगुआडा किल्ला असल्यामुळे ऐतिहासिक माहितीसोबत ऍडवेंचरला हि वाव मिळेल. आपण जिथे फिरण्यासाठी जातो तेथून लोक काहींना काही आठवण म्हणून काहीतरी आणतात .त्यासाठी तुम्ही शनिवार रात्री बाजारला जाऊन खरेदीसुद्धा करू शकता .
महाबळेश्वर – महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मुंबई पासून जवळ असल्यामुळे वर्षभर वीकेंड्सना पर्यटक येथे भेट देत असतात. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही महाबळेश्वरला नक्की भेट द्यायला हवी. महाबळेश्वरमध्ये पाहण्यासाठी काय काय आहे हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.
महाबळेश्वर मध्ये काय काय पाहण्यासाठी आहे?
विल्सन पॉईंट महाबळेश्वरमधील सर्वात उंच ठिकानाला तुम्ही भेट देऊ शकता. तसेच एलिफंट हेड पॉईंट , मॅप्रो (Mapro) गार्डन , लिंगमळा धबधबा , वेण्णा लेक, महाबळेश्वर प्राचीन मंदिर आणि पंचगंगा मंदिर अशी लोकप्रिय ठिकाण सुद्धा पाहता येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी ओळखले जाते. तेव्हा तुम्ही सहकुटुंब एखाद्या स्ट्रॉबेरी फार्मला भेट देऊन एक वेगळा आनंद लुटू शकता.
कोकण- कोकणामधे जायच म्हटले की आपल्याला ओढ लागते ती म्हणजे समुद्रकिनाऱ्याची .समुद्रकिनारपटी सोबतच देवगडच्या आंब्याचा आस्वाद द्यायचा असेल आणि कोकणामधे मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे स्वादिस्ट जेवण हवे असेल तर कोकणाला नक्की भेट द्या . या सर्वासोबतच अजून कोकणामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी भेट देऊ शकता हे जाणून घेऊयात .
कोकणामधे कोणत्या ठिकाणांना देऊ शकता भेट – तारकर्ली बीच हा कोकणामधील सर्वात प्रसिद्ध बीच असून , तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्कुबा डायव्हिंग सारख्या ॲक्टिविटी सहभागी होऊ शकता. यासोबतच तुम्हाला डॉल्फिन बघण्याचाही आनंद घेता येईल .थोड्याच अंतरावर रत्नागिरीमधील थिबा राजवाडा आणि राजवाडातील वस्तू संग्रालयाबद्दल तुम्हाला माहित जाणून घेता येईल . त्यानंतर तुम्ही अरबी समुद्राने वेढलेला मुरुड जंजिरा किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नौदलासाठी महत्वाचा असलेला किहीम बीच यालाही भेट देऊ शकता .
केरळ – केरळ म्हटले कि आपल्याला त्या ठिकाणची भाषा , संस्कृती , वेशभूषा , मंदिराची कलाकुसरी अशा अनेक गोष्टी पाहण्यास मिळतात . पण आज आम्ही तुम्हाला केरळमधे अजून काय प्रसिद्ध आहे . हे सांगणार आहोत .
केरळमधे काय काय प्रसिद्ध आहे ?
केरळ राज्याला सांस्कृतीक ठेवा लाभल्यामुळे त्याला देव भूमी म्हणून ओळखले जाते . त्यामुळे तुम्ही तिरूआनंतपुरम शहरातील मंदिरे व पद्मनाथन मंदिर पाहण्यासाठी जाऊ शकता . त्याचसोबत तुम्हाला काही शारीरिक आजार असतील तर केरळमधे आयुर्वेदिक सल्ला , औषधेंसुद्धा मिळण्यास सोईस्कर होईल . यासाठी हजारो लोक आयुवेदिक उपचारासाठी केरळला जात असतात . या सर्वासोबतच तुम्ही केरळमधील कोझिकोडे फार जुने बंदर ,परियाल राष्ट्रीय उद्यान,चहाचे मळे तसेच मुन्नार मधील धबधबे यांना भेट देऊन विविध गोष्टींचा आनंद घेऊ शकाल . तर जरूर एकदा तरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये केरळला भेट द्या .
लोणावळा – वेट एन जॉय वॉटर पार्क हे पुणे आणि मुंबईच्या मधे आहे . खूप लांब नसल्यामुळे अनेक पर्यटक तसेच स्थानिक लोक कामाच्या तणावातून थोडी विश्रांती मिळावी म्हणून सहकुटुंबासोबत तेथे जात असतात . हा पार्क छोट्या मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत आनंद देणारे ठिकाण असून. त्यामध्ये कॊणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत . हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत .
वेट एन जॉय वॉटर पार्कमधील ॲक्टिविटीज – या पार्कमध्ये एका दिवसाचे तिकीट काढल्यानंतर तुम्हाला एकाच ठिकाणी खेळण्याची , खाण्याची तसचे इतर सेवा उपलब्ध होतील . लहान मुलासाठी पोहण्यासाठी पूल , वोलकॅनो , वावे पूल , मास्टर ब्लास्टर , टोर्नेडो असे अनेक प्रकारचे ऍडवेंचर तुम्हाला करता येतील . या सुट्टीमध्ये वेट एन जॉय वॉटर पार्कला जाऊन तुमची सुट्टी मजेदार पणे घालवू शकाल . तर या पार्कला नक्की भेट द्या .