DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नांद्रा वनविभागाच्या क्षेत्रास लागली आग

सुदैवाने जिवितहानी टळली

  • पाचोरा | प्रतिनिधी

  • तालुक्यातील नांद्रा येथील वनविभागाच्या बांबरुड (राणीचे), लाख तांडा, आसनखेडा, महसास या शिवारातील वन विभागाच्या दोनशे ते अडीचशे हेक्टर वनक्षेत्राला दि. १६ एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागली. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बघता बघता संपूर्ण जंगल जळून नष्ट झाले. वन विभाग व पाचोरा अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. वन विभागाच्या लागुन असलेल्या शेतकऱ्यांना ह्या आगीचा फटका बसला. यात शेतकऱ्यांचा शेतातील ठिबक व ठिबकचे साहित्य जळून नष्ट झाले आहे. या आगीमध्ये वन्य प्राणी बाधीत झाल्याची चर्चा आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवितहानी झाली नाही. गेल्या वर्षी याच दिवसांवर आसनखेडा शिवाराकडुन जंगलाला आग लागली होती. त्यातही संपूर्ण जंगल जळून नष्ट झाले होते.

  • आगीच्या चौकशीची मागणी
    ज्या शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन जडून नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई व या आगीची सखोल चौकशी व्हावी; अशी मागणी सरपंच बुर्हान तडवी यांनी केली आहे. आग विझवण्यासाठी जुन्ने शिवारातील शेतकरी दिनेश वाघ, गणेश बैरागी, विजय पाटील यांच्या सह शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. वनविभागाकडून वन्य प्राण्यांना चारा व पाण्याच्या छावणी तयार करून देण्याची मागणी होत आहे.
बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.