DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अँपवर ओळख होऊन तरुणीला एकाने घातला ५ लाखांचा गंडा

जळगाव ;- चोपडा तालुक्यातील एका ३३ वर्षीय युवतीची एका तरुणाशी  ऍपवर ओळख झाल्यानंतर तरुणाने युवतीचा विश्वास संपादन करून सुमारे ४ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , चोपडा तालुक्यात राहणारी युवती हिची संशयित आरोपी डॉ. सनिष अमितव पेमा यांच्याशी  ऍपवर ओळख निर्माण झाली . यानंतर आरोपी डॉ. सानी याने विश्वास संपादन करून

दिनांक २६ जुलै २०२३ ते दि. २३/सप्टेंबर २०२३ यादरम्यान डॉ. सानिष अमितव पेमा याने इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करुन जिवनसाथी ॲप वर युवतीला यांना  ऑनलाईन अॅपवर रिक्वेस्ट पाठवुन फिर्यादी यांचे सोबत ओळख करुन व्हाट्सअप व जीमेल चॅट द्वारे चॅटींग करुन, फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वेगवेगळे कारणे सांगुन कल्पना कश्यप या नावाच्या HDFC बँक शाखा – सेक्टर १५C, वसुंधरा गाझीयाबाद उत्तरप्रदेश  बँक खात्यात PAYTM द्वारे व YONO SBI ॲपद्वारे एकुण ४ लाख ८९ हजार रुपये स्विकारुन युवतीची आर्थिक फसवणुक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने सायबर पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपासी अंमलदार :- पो.नि./ श्री. लिलाधर कानडे,करीत आहे .

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.